आजच्या संगणकाच्या युगात बहुतेक जण सफाईने संगणक हाताळतात. ज्यांना संगणक व्यवस्थित चालवता येत नाही त्यांना प्रचंड अडचणींना तोंड दयावे लागते. अशी अडचणीची वेळ आपणावर येऊ नये म्हणून आपण ‘ बेसिक कॉम्पुटर ‘ या विभागात संगणकाची प्राथमिक ओळख अगदी सहज सोप्या सर्वांना समजेल अशा भाषेत शिकणार आहोत.
आजच युग हे संगणक युग आहे. संगणक साक्षर असण्याबरोबरच संगणक निष्णात असेल तर मग सोन्याहूनही पिवळ. कॉम्पुटर टिप्स आणि ट्रिक्स या विभागात आपण कॉम्पुटरसंबंधी महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स शिकणार आहोत, जसे कि संगणकाचा वेग वाढविणे,संगणकाचा पासवर्ड बदलणे,व्हाटस अपचे अकाऊंट Hack करणे,इत्यादी त्या पुढीलप्रमाणे
Microsoft ऑफिस हे Microsoft ह्या जगप्रसिद्ध कंपनीने बनविलेले एप्लिकेशन सॉफ्टवेअरचा एक पूर्ण सुटच आहे. आपल्या दैनंदिन वापरात असणाऱ्या सर्व कामांसाठी यातील वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा उपयोग होऊ शकतो. जसे कि, जर तुम्हाला ऑफिस किंवा शाळेत कुठल्या विषयावर प्रेझेंटेशन करायचे असेल तर Microsoft ऑफिसमधील MS पॉवर पॉइंट या एप्लिकेशन सॉफ्टवेअरचा चांगला उपयोग होऊ शकतो. तसेच जर Microsoft वर्ड वापरून अनेक प्रकारचे डिजिटल डॉक्युमेंट तयार करू शकता. या विभागात आपण Microsoft ऑफिसचे खालील एप्लिकेशन सॉफ्टवेअर अगदी इत्यंभुतपणे शिकणार आहोत.
आपल्यापैकी बरेचजण कॉम्पुटरच्या दुनियेतली बाराखडी गिरवत असतात तर अनेकजण त्यात अगदी मास्टर माईन्ड असतात. मात्र बऱ्याचदा जर अचानकए साधा कॉम्पुटर बंद पडला तरी आपण हतबल होऊन जातो. अशा वेळेस जर आपल्याला कॉम्पुटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग थोडी जरी माहिती असली तर आपल्याला कुणावर अवलंबुन रहायची गरज येत नाही. आपल्या कॉम्पुटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग या विभागात आपण बेसिक ते एडव्हांस कॉम्पुटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग शिकणार आहोत. तुम्ही तुमच्या कामाच्या पातळीप्रमाणे याचा उपयोग करून घेऊ शकता. या विभागात आपण कॉम्पुटर हार्डवेअर आणि नेटवर्किंगचे खालील मुद्दे अगदी इत्यंभुतपणे शिकणार आहोत.
इंटरनेट मुळे जग आज अगदी मुठीत आले आले आहे. इंटरनेटचा वापर फक्त मनोरंजनासाठी न करता त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनातील अनेक महत्वाच्या गोष्टी अगदी घरबसल्या करू शकता. त्या खालीलप्रमाणे
आजकाल आपण नोकरी करताना किंवा कुठलाही व्यवसाय करताना तुम्हाला डिजिटल आणि सोशल मिडिया मार्केटिंगचे अद्ययावत ज्ञान असणे आवश्यक आहे. काळाची पावले ओळखून आपली वाटचाल चालू राहिली तरच स्पर्धेच्या युगात टिकण शक्य होईल. डिजिटल आणि सोशल मिडिया मार्केटिंग हि भविष्यकाळाची वेध घेणारी प्रमुख अस्त्र आहे. डिजिटल आणि सोशल मिडिया मार्केटिंगचा वापर करून तुम्ही प्रत्येकाच्या अगदी हातात पोहचू शकता. मग ते व्यवसायवृद्धीसाठी असो किंवा तुमच्या नोकरीसाठी किंवा तुमच्या वैयक्तिक कारणासाठी. डिजिटल आणि सोशल मिडिया मार्केटिंग अत्यंत महत्वाचे साधन आहे.यात आपण बघूया.
आपण संगणक वापरताय आणि आपल्याला फोटोशॉप माहित नाही असे होणारच नाही. फोटोशॉपबद्दल सांगायचं ठरलं तर फोटोशॉप म्हणजे अगदी अलिबाबाची गुहाच आहे. आणि फोटोशॉप शिकण्यासाठीही अगदी इंटरेस्टिंग सॉफ्टवेअर आहे. तुम्ही फोटोशॉपचा वापर करून दैनंदिन वापरातील फोटो एडिटिंगची अनेक कामे करून पैसे वाचावताही येतील आणि पैसे कामावातही येतील. फोटोशॉपमध्ये आपण खालील सर्व गोष्टी शिकणार आहोत. चला तर मग तयार आहात ना ?
बऱ्याचदा कोरल शिकण्याअगोदर अनेकजण हा प्रश्न विचारतात कि फोटोशॉप शिकल्यानंतर कोरल शिकण्याची गरज काय ? मात्र कोरल आणि फोटोशॉप हे बऱ्यापैकी वेगवेगळे सॉफ्टवेअर आहे. फोटोशॉपला काही मर्यादा आहे जसे कि, फोटोशॉपची ईमेज एका विशिष्ट मर्यादेनंतर फाटायला सुरुवात होते, कोरलमध्ये मात्र असे होत नाही. कोरलची ईमेज तुम्ही कितीही झूम केली तरी फाटत नाही. म्हणून तर मोठमोठे फ्लेक्स आणि प्रिंट मिडियाचे डिझाईन्स कोरलमध्ये बनविले जातात. त्याच प्रमाणे अनेक प्रकारच्या जाहिराती, ब्रोशर, पॅम्प्लेट इत्यादी कोरलमध्ये बनवली जातात. कोरलमध्ये आपण खालील गोष्टी शिकणार आहोत
जर तुम्हाला स्वतःलाच तुमच्या सहलीचे, लग्नाचे, व इतर अनेक प्रकारचे व्हिडीओ जर अगदी व्यावसायिक पद्धतीने स्वतःलाच एडीट करता आले तर ? मजा येईल ना ? मग चला तर Adobe premiere pro हे सॉफ्टवेअर वापरून अगदी प्रोफेशनल व्हिडीओ एडिटिंग करूया. व्हिडीओ एडिटिंग या कोर्समध्ये आपण पुढील गोष्टी शिकणार आहोत.
वेबसाईट म्हणजे काय हे तुम्हा सर्वांना माहीतच असेल मात्र ती वेबसाईट बनवायची कशी हे मात्र तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहित नसेल, पूर्वी वेबसाईट बनविणे अगदी किचकट काम होते. आता मात्र तसे नाही तुम्ही अगदी थोड्याच दिवसात वेबसाईट बनवायला शिकू शकता, आणि तेही अगदी प्रोफेशनल लेव्हलला. वेबसाईट बनविण्यासाठी आज घडीला शेकडो पर्याय उपलब्ध आहे. त्यापैकीच एक म्हणजे वर्डप्रेस. वर्डप्रेस हा एक मोफत व ओपन सोर्स content management system platform आहे. यामध्ये PHP आणि MYSQL वापरले जाते. म्हणजे इथे तुम्हाला फक्त तुमच कंटेंटचं व्यवस्थापन करायचं आहे. म्हणजेच कोडींग वैगेरे काही नाही. तुम्ही फ्रंट एंडला काम करा, तुमच्या वेब पेजची कोडींग आपोआप तयार होईल. आणि महत्त्वाचे म्हणजे आजकाल सगळीकडे जास्तीतजास्त वर्डप्रेसच वापरले जाते. चला तर मग मस्तपैकी वेबसाईट बनवायला घेऊया.